नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील रज्जाक पार्क येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील रज्जाक पार्क येथील विवाहिता शबनम अस्लम पिंजारी हिस सासरच्या मंडळींनी शुल्लक कारणावरुन टोमणे मारुन विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
या छळास कंटाळून शबनम अस्लम पिंजारीने आत्महत्या केली. याबाबत लियाक बिस्मिल्ला शेख यांच्या फिर्यादीवरुन सासरच्या सानूरबी, मसुदभाई पिंजारी, यास्मीन, सालीया, आसिफ सर्व रा.रज्जाक पार्क, नंदुरबार यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.









