Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुडा हरित अभियानांतर्गत मान्यवरांच्या हस्ते १५ लाख रोपांचे वाटप, मिनी राईस मिलचेही करण्यात आले उद्घाटन

team by team
July 29, 2022
in राजकीय
0
सातपुडा हरित अभियानांतर्गत मान्यवरांच्या हस्ते १५ लाख रोपांचे वाटप, मिनी राईस मिलचेही करण्यात आले उद्घाटन

नंदुरबार | प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील झिरी (पाठडी) येथे सातपुडा ग्रीन व्हॅली ऍग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी, भारती उद्योग व भारती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, युवक, महिला मंडळ व गरजू लोकांना सालाबादप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते १५ लाख रोपांचे वाटप करण्यात आले.भारती उद्योगामार्फत उभारलेली मिनी राईस मिलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

झिरी (पाठडी) येथे रोप वाटप व राईस मिलचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आ.आमश्या पाडवी,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड.सिमा वळवी,मा.आ.चंद्रकांत रघुवंशी, सातपुडा ग्रीन व्हॅली ऍग्रीक्लचर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन पर्यावरणप्रेमी, माजी मंत्री.ऍड.पद्माकर वळवी,भारती फाउंडेशन व भारती उद्योगाच्या अध्यक्षा योगीताताई पद्माकर वळवी,आदिवासी एकता परिषदेचे सांगल्याभाई वळवी,दरबारसिंग पाडवी, एकता परिषदेचे भिमसिंग वळवी,

 

जि.प.सदस्य सुहास नाईक,प्रताप वसावे, निशाताई वळवी नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, कुणाल वसावे, प.स.सदस्य सुमनबाई वळवी, अर्जुन वळवी, सुधाकर वळवी, अभियंता दिनेश पाटील, जि.डी पाडवी, प.स.सदस्य आनंदा दादा,ओरसिंग पटले, कृषि विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोंडे,शिवराम वळवी, धर्मेंद्र वळवी, राजकुमार पाडवी, गणेश पाटील, सिताराम रहासे, राहुनल पाडवी आदी उपस्थीत होते.यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कुलदैवत याहामाता मातेच्या पुजन करण्यात आले.

यावेळी प्रस्तावना करतांना माजी मंत्री.ऍड.पद्माकर वळवी म्हणाले कि, सातपुडा हरित अभियान गेल्या २० वर्षांपासुन सुरू असुन आतापर्यंत करोडो रोपांचे वाटप करण्यात आले आहे. ५०० शेतकरी मिळुन सातपुडा ग्रीन व्हॅली ऍग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून बांबु प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे.सातपुड्यातील बांबु संपण्याच्या मार्गावर असतांना डांग, पेड सुरगणा, मध्य प्रदेशातुन बांबुचे बियाणे मागवुन रोपे बनवुन वाटप केले.अद्याप २५ लाखाच्यावर रोपे शिल्लक आहेत.

 

नाविन्यपूर्ण अश्या या उपक्रमामुळे पडीक जमिनीवर लागवड केल्यास उत्पन्नाचे साधन, नदी-नाल्यापासून शेतजमीनीचे संरक्षण, जमिनीची धूप थांबविणे, शेतीपूरक उत्पादन म्हणून झाडाची लागवड केल्यास पाण्याची पातळी वाढण्यास उपयोगी, जमिनीचे संरक्षण, पर्यावरण संतुलनास मदत व वृक्ष लागवडीमुळे आदिवासी भागाची गतवैभवाची ओळख पुन्हा प्राप्त होण्यासाठी सातपुडा परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावणे काळाची गरज आहे.त्यामुळे सर्वांनी मिळुन सातपुडा हरित करण्यासाठी सामुहिक वुक्षारोपण करून संगोपण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगीतले.

यावेळी बोलतांना मा.आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले कि, गेल्या २० वर्षांपासुन सामाजीक बांधीलकी जोपासत रोपांचे वाटप करीत सातपुड्याचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मा.मंत्री पद्माकर वळवी झटत आहेत. शासनाच्या भरवश्यावर न राहता मा.मंत्री पद्माकर वळवी यांनी आखलेल्या योजनेनुसार सातपुड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन श्री.रघुवंशी यांनी केले.

 

यावेळी आ.आमश्या पाडवी म्हणाले कि,आदिवासी समाज हा प्रकृती पुजक समाज आहे.शासनाने व जिल्हा परिषदेने विविध योजना देतांना सातबार्‍यात झाडांची नोंद पाहुनच योजना देण्याचा नियम काढावा, शेतकरीच वृक्षारोपण व वुक्षसंगोपण करू शकतो. सातपुड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतने.

 

आभार जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी केले.त्यांनी सांगीतले की, सातपुडा हरित अभियान गेल्या २० वर्षांपासुन सुरू असुन आतापर्यंत करोडो रोपांचे वाटप करण्यात आले आहे. या अभियानास तिव्र गती देण्यासाठी सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगीतले.

 

यावेळी महाराष्ट्र गुजरात असा भेद न करता शेतकरी, युवक, महिला मंडळ व गरजू लोकांना बांबू, साग, कडुलिंब, सीताफळ व महू अश्या विविध १५ लाख रोपांचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भारती उद्योगामार्फत उभारलेली मिनी राईस मिलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी कंपनी सदस्य, सर्व मित्र परिवार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा शहर भाजपातर्फे काॅग्रेसचे खा.अधिर रंजन चौधरी यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन

Next Post

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

Next Post
पदवीधर, शिक्षक मतदारसंघ मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add