नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथे नगरपालिका परिसरात हद्दपारीचे आदेश असतांनाही फिरतांना आढळून आल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी येथील अजय उर्फ टायगर राजेंद्र पावरा यास जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश असतांनाही तो शहादा शहरातील नगर पालिका परिसरात फिरतांना आढळून आला.
याबाबत पोना.गोपाल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अजय पावरा याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रमण वळवी करीत आहेत.








