नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव शहादा रस्त्यावरील दरा पिपरांणी जवळ
स्विफ्ट डिझायर कारने दुचाकी स्वारांना उडवल्याची घटना घडली आहे.यात दोघे गंभीर जखमी झाले असून स्विफ्ट डिझायर कार चालक फरार आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, धडगाव- शहादा रस्त्यावरील दरा पिपरांणी गावाजवळ स्विफ्ट डिझायर कारचा ( एम.एच.१५, डी.सी.०७१४) व दुचाकी भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट डिझायर कार चालकाने दुचाकीला जबर धडक दिली.
या अपघातात नवलसिंग महादू पावरा रा. रोषमाळ बुद्रुक व रतिलाल कलशा पाडवी रा. कुंडल ता.धडगाव हे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी म्हसावद पोलीस दाखल झाले असून जखमींना तत्काळ म्हसावद ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याबाबत अधिक तपास म्हसावद पोलिस करीत आहे.








