नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील गेंदा येथे शेतीच्या वादातून दोघांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील गेंदा येथील समशेर पाल्या पावरा यांना लोट्या वाण्या पावरा याने शेतात जावून ही आमची शेती आहे, तुम्ही शेतात पाय ठेवू नका असे सांगून समशेर पावरा व साक्षीदार यांना लोट्या वाण्या पावरा, किला वाण्या पावरा, मोयला उतराण्या पावरा, रडत्या खुमश्या पावरा,
गेटा खुमशा पावरा व सायसिंग देवाजी पावरा यांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत समशेर पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४४७, ५०४, ५० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कालूसिंग पाडवी करीत आहेत.