Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते गवळी वाड्यातील मरीमाता मंदिर जिर्णोद्धार लोकार्पण सोहळा

team by team
July 22, 2022
in राजकीय
0
माजी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते गवळी वाड्यातील मरीमाता मंदिर जिर्णोद्धार लोकार्पण सोहळा

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील गवळीवाडा परिसरातील नंदेश्वर चौकात असलेल्या जुन्या मरीमाता मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला. नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिराचा लोकार्पण सोहळा अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी झाला.

प्रतिवर्षी आषाढ महिन्यात कुटुंबासह गावावर येणारे अरिष्ट दूर व्हावे या भावनेतून मरीमाता मंदिरात पूजा अर्चना करण्यात येते. प्रभाग क्रमांक 18 चे भाजपा नगरसेवक गौरव प्रकाश चौधरी यांनी स्वखर्चाने गवळीवाड्यातील मरीमाता मंदिराची उभारणी केली.शुक्रवारी आषाढ महिन्यानिमित्त मंदिराचा जीर्णोद्धार आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या लोकार्पण सोहळया प्रसंगी बोलताना माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, गोरगरीब जनतेची सेवा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते.केवळ भूलथापा आणि वल्गना न करता खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गरिबांच्या समस्या जाणणारे लोकप्रतिनिधी लोकप्रिय ठरतात.

अमळनेर मतदार संघ असताना देखील सुमारे दोन कोटी रुपये नंदुरबार शहरातील विकास कामांसाठी मंजूर करण्याचे कसब केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे झाल्याचे सांगितले.तसेच आगामी काळात गवळीवाड्यात भव्य समाज मंगल कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिले.

याप्रसंगी भाजपा गटनेते व नगरसेवक चारुदत्त कळवणकर व नगरसेवक गौरव चौधरी यांनी गेल्या चार वर्षात जनतेच्या सेवेचे व्रत घेतले असून भविष्यात देखील कायम राहणार असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवळी समाज संस्थेचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले.लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नगरसेविका सौ.संगीता वसईकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, आनंद माळी, निलेश पाडवी, लक्ष्मण माळी, अर्जुन मराठे, रुग्णसेवक संतोष वसईकर, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश चौधरी, भीमसिंग राजपूत,

तसेच गवळी समाजाचे गंगाराम यादबोले, गौराजी देवर्षी लक्ष्मण गवळी, अण्णा घुगरे, काशिनाथ गोडळकर, आनंदा घुगरे ,अंबु गेनाप्पा ,खंडू हुच्चे, तुकाराम उंदीकर, काशिनाथ गेनाप्पा, संजय जोमिवाळे, हेमंत नागापुरे, लक्ष्मण गठरी, योगेश बारसे,बाला चौधरी यांच्यासह गवळीवाड्यातील गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मरीमाता मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीरशैव लिंगायत गवळी समाज पंचमंडळी आणि युवकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे ..ठाणेपाडा आश्रमशाळेची विहिर हरवली

Next Post

निवुत्त मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांसाठी दिले एक लाखाचे पाणी फिल्टर व कुलिंग यंत्र

Next Post
निवुत्त मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांसाठी दिले एक लाखाचे पाणी फिल्टर व कुलिंग यंत्र

निवुत्त मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांसाठी दिले एक लाखाचे पाणी फिल्टर व कुलिंग यंत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add