नंदुरबार l प्रतिनिधी
बटरफ्लाय या लघु हिंदी चित्रपटातील बालकलाकार प्रशंसा तंवर हिस सेव्हन सिस्टर्स नॉर्थ ईस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट बालकलाकार अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. प्रशंसा तंवर ही येथील स्मित हॉस्पिटलचे संचालक निलेश तंवर व राखी तंवर यांची कन्या आहे.
नंदुरबार येथील बालरोग तज्ज्ञ डॉ.सुजित पाटील दिग्दर्शीत बटरफ्लाय या लघु हिंदी चित्रपटात बालकलाकार प्रशंसा तंवर हिने अभिनय केला होता. प्रशंसा तंवरच्या अभिनयाला सर्व स्तरावरून दाद मिळाली होती.
त्यातच सेव्हन सिस्टर्स नॉर्थ ईस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रशंसा तंवर हिस उत्कृष्ट बालकलाकार अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रशंसा हिस आर्यन एम प्रोडक्शन लखनऊ आयोजित हुनरके हुन्नरबाज नृत्य स्पर्धा २०२१ (प्रथम), नंदुरबार येथील नगराध्यक्षा करंडक देशभक्ती पर नृत्य स्पर्धेत (प्रथम), डेझनिंग फेस ऑफ पुणे २०१९ विजेती,
शायनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र २०१९ विजेती, सुपर स्टार कलाकार ऑनलाईन रोटरी शो २०२० (प्रथम), फॅशन फेस्टिवल नंदुरबार २०१९ विजेती, जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘डॉक्टर्स फॉर बेगर्स’ या एकांकिकेत अभिनय केला आहे. तसेच बटरफ्लायसह ‘मी एक स्वप्न पाहिले’ या मराठी लघु चित्रपटात देखील अभिनय केला आहे. प्रशंसा हिस मिळालेल्या या यशाबद्दल प्रशंसासह ‘बटरफ्लाय’च्या संपूर्ण टीम चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








