नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील आसाणे येथील जि.प.शाळेची स्थापना सण 1956 साली झाली.तब्बल या शाळेला 66 वर्ष पूर्ण झाले असून ती शाळा आज पूर्णतः जीर्ण अवस्थेत आहे.ज्या शाळेतून उज्वल राष्ट्राची पुढची पिढी घडणार आहे त्या शाळेची अशी दुरावस्था पाहून संतप्त पालकांनी शाळा बंद आंदोलन केले
आसाणे गावाची शाळा ही मुख्य रस्त्यापासून 3 ते 4 फूट खोलीवर आहे त्यामुळे पावसाळ्यात पाणी शाळेत जाते,शाळेतील भिंतींना मोठ-मोठे तडे,वरील लोखंडी पत्रे पूर्णतः गँजलेले निकामी झाले असून ऐन पावसाळ्यात पूर्ण शाळा टीप टीप गळत असते,वर्गातील भिंतीना पूर्णपणे ओलावा असतो त्या केव्हा पडतील या भीतीने शिक्षक मुलं जीव धोक्यात ठेऊन वावरत आहे.

त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न सातत्याने जाणवत आहे. वर्गातील मुलांच्या बसण्याच्या जागेवर देखील सर्व फरशी निघून मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत अश्यातच पर्यायाने काही वर्ग बाहेरच घ्यावे लागतात.
शिक्षणाने राष्ट्राचा विकास होतो पण गावातच पडकी ,धोकादायक शाळेत त्यामुळे मुलांना जे शिक्षणासाठी पोषक असे वातावरण पाहिजे ते मिळत नसल्यामुळे गावातील सर्वच पालक हैराण झाले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर सदर शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायमार्फत पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच जि प नंदुरबार येथे नूतन इमारती साठी 14 जाने 2022 रोजी देखील पंचायत समिती नंदुरबार येथे पाठपुरावा केला होता. वारंवार पाठपुरावा करून देखील शासन स्तरावर कुठल्याही प्रकारे या शाळेची दखल घेतली जात नाही.
शासन स्तरावरून कुठल्याही प्रकारे हालचाली होत नसून तालुक्यातील अधिकारी वर्गाचे लक्ष वेधण्यासाठी आसाणे गावातील सर्व पालक,शालेय समिती, गावातील नागरिक जि.प. शाळेजवळ एकत्र येऊन शाळा बंद आंदोलन पुकारले.गावातील सर्व सुजाण नागरिक पालक यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला आमच्या शाळेसाठी दुरुस्ती निधी न देता सदर शाळा ही 60 वर्षा पलीकडील शाळा आहे तरी जि. प.शाळेतूनच या राष्ट्राची पुढील पिढी घडत असताना या गावाच्या शाळेची अशी दुर्दशा मुळे शाळेत मुलांचे मन रमत नसून,भौतिक व्यवस्था सुद्धा या शाळेत नाहीत ,शिवाय गावाची लोकसंख्या च्या दृष्टीने जि.प.शाळेत मुलांचा भरपूर पट असताना देखील या शाळेत मुलांना शिकवण्यासाठी 3 शिक्षक पदे देखील कमी आहेत.
या सर्व बाबीचा विचार विनिमय करून पंचायत समिती व जि प प्राथमिक शिक्षण विभागाने वेळीच दखल घेऊन आसाणे येथील जि प शाळेचा प्रश्न सोडवावा नाहीतर पुनः च शाळा बंद आंदोलन करून जिल्ह्य स्तरावर उपोषण करण्यात येईल.
यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक हरिश्चंद्र पाटील,पावरा,गावित ,श्रीमती सोनाली शिंदे, शालेय समिती अध्यक्ष योगेश पाटील,भारत पाटील,रविंद्र पाटील,समाधान पाटील,नारायण पाटील,अधिकार सावळे,दादाभाई पाटील,विनोद पाटील,सुनील पाटील,रवींद्र पाटील,गोकुळ पाटील,दिलीप पाटील,चंदू पाटील,किरण पाटील आदी पालक व गावकरी उपस्थितीत होते.








