Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

team by team
July 20, 2022
in शैक्षणिक
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 पर्यंत उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तसेच 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 पर्यत माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी

गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

श्रीमती डी.आर हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, नंदुरबार, वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा, न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु.कॉलेज अक्कलकुवा, श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नवापुर अशा 4 उपकेंद्रावर इयत्ता 12 वी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर यशवंत विद्यालय खोडाईमाता रोड, नंदुरबार व म्युनिसिपल न्यु इंग्लिश स्कुल, शहादा अशा 2 उपकेंद्रावर इयत्ता 10 वीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 व 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीतील दहावी व बारावीच्या परिक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये.

सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

व्यापार्‍याच्या लुटणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी केली अटक

Next Post

संतप्त पालकांचे शाळा बंद आंदोलन : आसाणे येथील जि.प.शाळेची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

Next Post
संतप्त पालकांचे शाळा बंद आंदोलन : आसाणे येथील जि.प.शाळेची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

संतप्त पालकांचे शाळा बंद आंदोलन : आसाणे येथील जि.प.शाळेची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add