Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्यापार्‍याच्या लुटणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी केली अटक

team by team
July 20, 2022
in क्राईम
0
७२ कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

शहादा | प्रतिनिधी

शहरातील डोंगरगाव रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी एका व्यापार्‍याच्या मोटरसायकलीच्या डिक्कीतून ६ लाख ३३ हजार रुपयाची रोकड काढून फरार झालेल्या बंटी-बबली गँगमधील बबली अर्थात अर्चनाबेन अमितभाई राठोड हिला गुप्त माहितीच्या आधारावर शहादा पोलिसांनी कुबेरनगर- अहमदाबाद येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.तर या घटनेतील दुसरा आरोपी बंटी अर्थात पप्पू इंद्रीकर यास बेटावद ता शिंदखेडा येथून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १३ मे २०२२ रोजी शहरातील डोंगरगाव रस्त्यानजीक श्रीहरी हॉस्पिटल समोर दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली होती. मोटारसायकलीने जाणार्‍या खेतिया येथील व्यापारी सुभाष कोठारी यांना मागून दोन मोटारसायकलींवर येत बंटी-बबली बोलबच्चन गँग मधील चार जणांनी गाडीला कट का मारला असे सांगून भांडण सुरु केले.

 

बबलीने त्या सुभाष कोठारीची चावी काढून घेतली व संधी साधत मोटरसायकलच्या डिक्कीतून पिशवीत असलेली ६ लाख ३३ हजार १४० रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. त्यानंतर व्यापार्‍याचे डिक्कीकडे लक्ष गेले असता डिक्की उघडी दिसली व त्यातील रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले.

 

या घटनेने पोलिस प्रशासनही हादरून गेले होते. घटनेला दोन महिने उलटल्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर घटनेतील आरोपी अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोलिस कर्मचारी नागलोत, शिरसाठ, निर्मला पावरा यांच्या पथकाने अहमदाबाद पोलिसांच्या सहकार्याने या गँगमधील बबली अर्चनाबेन अमितभाई राठोड हीस तिच्या राहत्या घरातून मोठ्या शिताफीने अटक केली.

 

या दरम्यान तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. घटनेतील तिचे सहकारी बंटी पप्पू इंद्रेकर (वय २६), रोजनिश धर्मु गुमाणे (वय ३८), सतीश ललिया गुमाने (वय ४०) रा.कुबेरनगर-अहमदाबाद हे तिघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान या घटनेतील दुसरा आरोपी बंटी अर्थात पप्पू इंद्रीकर ( रा .कुबेरनगर- अहमदाबाद )हा बेटावद ता शिंदखेडा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचुन त्यास काल सायंकाळी अटक केली त्यास  दि. 20 रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे या घटनेतील बोल बच्चन गॅंगचे बंटी व बबली अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

निपुण भारतअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात

Next Post

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add