तळोदा l प्रतिनिधी
मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी संघाचे अध्यक्ष म्हणून उल्हास मगरे तर उपाध्यक्षपदी दिपक मराठे यांची व विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात शासकीय विश्राम गृहाच्या आवारात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी संघाच्या बैठकीत विविध सकारात्मक निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर विविध पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष उल्हास नामदेव मगरे यांची सर्वांमध्ये निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून दिपक मराठे तर सचिव म्हणून हंसराज महले व कोषाध्यक्ष म्हणून सुशील सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.
यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कालीचरण सूर्यवंशी,जेष्ठ सदस्य दत्तात्रय सूर्यवंशी,भरत भामरे,ईश्वर मराठे, तसेच किरण पाटील,महेंद्र लोहार,सम्राट महाजन, राकेश पवार , महेंद्र सूर्यवंशी,दिपक गोसावी आदी उपस्थित होते.