Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी. आर. हायस्कूल मध्ये राष्ट्रीय कबड्डी दिवस साजरा

team by team
July 16, 2022
in शैक्षणिक
0
डी. आर. हायस्कूल मध्ये राष्ट्रीय कबड्डी दिवस साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथे राष्ट्रीय कबड्डी दिन इयत्ता नववी दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी प्रत्यक्ष कबड्डीचे सामने खेळून साजरा केला.

सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक यांनी श्रीफळ वाढवून कबड्डी सामन्यांची सुरुवात केली.

इयत्ता 9 वी व 10 वीचे दहा तुकड्यांचे 10 संघ यावेळेस तयार करण्यात आले व एकूण नऊ मॅचेस खेळवण्यात आल्या व अंतिम सामना इयत्ता 9 वी क आणि इयत्ता 10 वी ब या वर्गांच्या संघांमध्ये रंगला व इयत्ता 9 वी क च्या संघाने विजेतेपद तर 10 वी ब च्या संघाने उपविजेतेपद मिळवले.

याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळण्याचा मनसोक्त असा आनंद लुटला. संगीतमय वातावरण, विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांची सुद्धा कबड्डीची स्पर्धा, आकाशातून अधून मधून वरूण देवताची हजेरी असे जणू एकंदरीत संपूर्ण वातावरण हे क्रीडामय झाले होते.

या सर्व यशस्वी संघांना इयत्ता 9 वी व 10 वीचे वर्गशिक्षक तसेच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी जवळपास 2500 रुपयांचे बक्षीस यानिमित्ताने जाहीर केले. सर्वांनी अतिशय मनमुरादपणे खेळण्याचा आनंद लुटला व खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कबड्डी दिवस साजरा करण्यात आला.

या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्छाव, क्रीडा शिक्षक निलेश गावित, अशोक वसईकर, योगेश गवते, घनश्याम लांबोळे, दिनेश वाडेकर, मिलिंद चव्हाण, तुषार नांद्रे, रवींद्र पाटील आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ पैसा व वेळेची बचत : गावातच होणार न्यायनिवाडा

Next Post

घरफोडी व चोरी करणारे 3 संशयित आरोपींना 87 हजाराच्या मुद्देमालासह अटक

Next Post
बँकेतून मुद्रालोनचे आश्वासन देऊन ४५० नागरीकांची साडे पाच लाखात फसवणुक, महीलेविरुद्ध गुन्हा दाखल

घरफोडी व चोरी करणारे 3 संशयित आरोपींना 87 हजाराच्या मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add