Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा नवीन वर्षात पदार्पण सोहळा उत्साहात

team by team
July 14, 2022
in सामाजिक
0
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा नवीन वर्षात पदार्पण सोहळा उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षापासून रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे कार्य उत्तरोत्तर प्रगती करत असून एका वेगळ्याच उंचीला पोहोचलेला हा क्लब विविध सेवाभावी कार्यामुळे नावारूपाला येत आहे. या क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांमुळे सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.

3060 चे 2024/25 या वर्षाचे डी.जी.एन. तुषारभाई शाह व स्नेहलबेन शाह असिस्टंट गव्हर्नर हर्षल अहिराव यांच्या उपस्थितीत सकाळपासून विविध उर्दू व माध्यमिक शाळेत शैक्षणिक साहित्यांची व बिस्किटांचे वाटप तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

शहराच्या प्रवेश मार्गावर स्वागत फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला फलकाचे लोकार्पण सोहळा पार पडला.आषाढी एकादशी निमित्ताने विविध भक्ती गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या भावगीत स्पर्धेचे परीक्षण सुनिता चव्हाण,हेमंत पाटील व विजय अजमेरा यांनी केले. सहभाग नोंदविणारे स्पर्धकांना व प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.गरीब वस्तीत ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी पदग्रहण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.मावळते अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी नूतन अध्यक्ष अनिलभाई शर्मा यांना अध्यक्ष पदाची धूरा सोपविला. तसेच मावळते सचिव अनिलभाई शर्मा यांनी नूतन सचिव किरण दाभाडे यांना सचिव पदाचा कार्यभार सोपविला.

मागील वर्षी 235 प्रोजेक्ट क्लबने पूर्ण करून 15535 लोकांपर्यंत रोटरीचे कार्य पोहोचले.असे प्रतिपादन मावळते अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमाला डी.जी.एन.तुषार शाह, स्नेहलबेन शाह, असिस्टंट गव्हर्नर हर्षल अहिराव डॉ.युनूस पठाण उपशिक्षणाधिकारी प्राथ. नंदुरबार ज्येष्ठ विधीतज्ञ अँड.सलीम व्होरा,नेहा शाह,कुणाल वसावे, नगरसेवक उद्योगपती मदनलाल जैन,शब्बीर मेमन,डॉ.विशाल चौधरी निलेश तवर,जितेंद्र सोनार,रमाकांत पाटील,प्रितेश बांगड, भिका चौधरी, नागसेन पेंढारकर, मनोज गायकवाड कार्यक्रमाला उपस्थित होते.

रोटरी क्लबचे फांऊडर जेष्ठ रोटेरिअन, यशवंत स्वर्गे यांना “रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या” वतीने “जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अँड प्रेम इंदानी,प्रवीण पाटील, नरेश नानकणी,डी.डी.साळुंके, संजय शर्मा,सय्यद इसरार,राजेश शर्मा,

संजय राजपूत, विकास तोष्णीवाल,श्याम लवणे संदीप रंगलाणी, विजय रंगलाणी,राहुल पाटील,सज्जाकभाई, हर्षल पाटील, युनूस भाई, सोनल, हर्षल लवणे,प्रवीण येवले, संजूभाई शर्मा ,फैयाज खान, आकाश जैन, राहुल पाटील,राजू पुजारा,सज्जन भाई,विजय बडगुजर,फकरुदी्नभाई जलगाववाला,राजू पुजारा,अब्बास काटावाला,यांनी परिश्रम घेतले .तसेच सतिश चौधरी अध्यक्ष,लायन्स क्लब नंदुरबार हे कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव,किरण दाभाडे यांनी केले.तर सूत्रसंचालन ॲड. सुशील गवळी,निलेश तवर यांनी केले.तसेच आभार अध्यक्ष,अनिल शर्मा यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे गुरुपौर्णिमा साजरी

Next Post

सतर्कतेचा इशारा : सारंगखेडा बॅरेजचे ४ व प्रकाशा बॅरेजचे ५ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

Next Post
सतर्कतेचा इशारा : सारंगखेडा बॅरेजचे ४ व प्रकाशा बॅरेजचे ५ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

सतर्कतेचा इशारा : सारंगखेडा बॅरेजचे ४ व प्रकाशा बॅरेजचे ५ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add