नंदूरबार l प्रतिनिधी
आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती मातेच्या पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.पी.आर.वसावे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.बी.हुंबरे, पर्यवेक्षक प्रा.के.आर.पदमर,व एन. एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. आर . मगरे , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एच. पिंपरे, सहाय्यक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. एस .डी. गिरासे,
माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. यु.टी. पावरा, प्रा.एस.के.तडवी, प्रा.सी.के.ठाकरे तसेच , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.पी.आर.वसावे. प्रा.एच.के.चौधरी, प्रा.एस.ए. यशोद, प्रा.एस. एच.टवाळे प्रा.जे.जी.मगरे ,प्रा.जे पी मगरे, प्रा.पी.एस.जैन,प्रा.आर.आर.माळी,प्रा.पी.टी.वळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.जे.पी.मगरे यांनी केले.








