Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सासू- सून गेले पिण्याचे पाणी भरायला, नदीला पुरात सासू गेली वाहून

team by team
July 13, 2022
in क्राईम
0
सासू- सून गेले पिण्याचे पाणी भरायला, नदीला पुरात सासू गेली वाहून

नंदूरबार l प्रतिनिधी

सुनेसोबत पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेलेली महिला नदीला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना गमन ता. अक्कलकुवा येथे घडली.अक्कलकुवा तालुक्याला गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

त्यामुळे नदी नाल्याना पूर आले आहे. गमन येथील दोहरीबाई वाडग्या वसावे (४५, रा.गमणचा बंगाबारी) ही महिला दि.11 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आपल्या सुनेसोबत नाल्यावर पाणी भरायला गेली होती. पाणी भरुन सुन माघारी परतली.

दोहरीबाई या देखील पाणी भरुन जाण्यासाठी निघाल्या, तेवढ्यात नाल्याला अचानक पाणी आल्याने दोहरीबाई या पाण्यात वाहुन गेल्यात. त्या नाल्यातुन वाहत जाऊन धबधब्यावरुन पडुन नर्मदा नदीच्या पाण्याच्या फुगवटयामध्ये पडल्या.

त्यांचा मृतदेह नर्मदेच्या फुगवटयामध्ये दुपारी 3 वाजेच्या सुमारास आढळला. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह नर्मदा किनाऱ्यावर काढण्यात आला.

अतिवृष्टी असल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी काल नेता आला नाही. ठिकठिकाणी रस्ते बंद असल्या कारणांने प्रशासनाला ही मदतीसाठी जाता आले नाही.

दरम्यान, आज ग्रामस्थांनी पारंपारिक बांबूलन्सने सुमारे 6 ते 7 किलोमीटर पायपीट करीत मृतदेह सोगाआंबा पर्यंत आणण्यात आला.

तेथुन सहा.पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेने मृतदेह शव विच्छेदनासाठी मोलगी येथे आणला. याबाबत मोलगी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीर वाहनाचा शुभारंभ

Next Post

वावद येथे ग्राहक सेवा केंद्र व खत गोडाऊनचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
वावद येथे ग्राहक सेवा केंद्र व खत गोडाऊनचे  जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

वावद येथे ग्राहक सेवा केंद्र व खत गोडाऊनचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add