Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीर वाहनाचा शुभारंभ

team by team
July 13, 2022
in राज्य
0
फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीर वाहनाचा शुभारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई द्वारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार मार्फत फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीर वाहनाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या.आर.एस.तिवारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

जिल्हा न्यायालय, नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश आर.जी.मलशेट्टी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस.टी.मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.जी.चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि.व्ही.हरणे,

सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही.एन.मोरे, आर. एन. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती.वाय.के.राऊत, एन.बी.पाटील, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष पी.बी.चौधरी, ॲड.शारदा पवार, ॲड.आर.डी.गिरासे इतर विधिज्ञ व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

हे फिरते लोकअदालत वाहनामार्फत जिल्ह्यातील निवडक तालुक्यात फिरुन न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच बँकांचे, विमा कंपनी, विद्युत महामंडळ, बीएसएनएल व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना लोकअदालतीचे व विधी सेवाविषयी कायदेविषयक मार्गदर्शनही केले जाणार आहे.

तालुकानिहाय त्यांचा दौरा कार्यक्रम असा 13 जुलै 2022 रोजी रनाळे ता.जि.नंदुरबार येथे पोलीस ठाणेच्या प्रांगणात फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर तालुका विधी सेवा समिती मार्फत

नवापूर येथे 14 व 15 जुलै 2022 रोजी. अक्कलकुवा येथे 16 व 17 जुलै 2022 रोजी. तळोदा येथे 18 व 19 जुलै 2022 रोजी तर शहादा येथे 20 व 21 जुलै 2022 रोजी फिरते लोकअदालतीचे व विधी सेवेचे कायदेविषयक शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उद्घाटनपर कार्यक्रमानंतर नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथे कायदेविषयक शिबीर व विधी सेवेचा कार्यक्रम संपन्न झाला. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे प्रत्येकी तीन दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

Next Post

सासू- सून गेले पिण्याचे पाणी भरायला, नदीला पुरात सासू गेली वाहून

Next Post
सासू- सून गेले पिण्याचे पाणी भरायला, नदीला पुरात सासू गेली वाहून

सासू- सून गेले पिण्याचे पाणी भरायला, नदीला पुरात सासू गेली वाहून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add