Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केला शहादा नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम

team by team
July 12, 2022
in राजकीय
0
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केला शहादा नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहादा नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होणार असून संबंधित नगरपरिषद क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम असा राहील

अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन मंगळवार 5 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. बुधवार 20 जुलै 2022 रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात येईल. 22 जुलै 2022 (शुक्रवार) ते 28 जुलै 2022 (गुरुवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 23 व 24 जुलै 2022 सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येईल.

शुक्रवार 29 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. व उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. गुरुवार 4 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अपील नसेल तेथे नामनिर्देशपत्र मागे घेता येईल.

अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशपत्र मागे घेता येईल.उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

गुरुवार 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल, तर शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना कलम 19 मधील तरतुदीनुसार प्रसिद्ध करण्यात येईल.

शहादा नगरपरिषद क्षेत्रात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. या निवडणुकीकरिता आचारसंहिता जरी संबंधित नगरपरिषद क्षेत्रात लागू झालेली असली तरी निवडणुक असलेल्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक नगरपरिषद मतदारांवर प्रभाव पडेल, अशा तऱ्हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय,

कोणतीही कृती, घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार अथवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये विनापरवाना सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण गुन्हा आहे याची नोंद घ्यावी. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नर्मदा घाटीत मुसळधार पाऊस,रस्ते वाहून गेल्याने नर्मदा काठावरील अनेक गावांचा संपर्क तूटला

Next Post

शहादा तालुक्यातील वाकी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post
पर्यायी रस्ता वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला

शहादा तालुक्यातील वाकी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add