Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

team by team
July 8, 2022
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. गतवर्षी यावेळेपर्यंत जवळपास ७० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र ५५ मिलिमीटरच पाऊस झाल्याची नोंद असून खरीप हंगामातील शेतीकामे खोळंबली होती.

त्यामुळे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नंदुरबार जिल्हा वासियांना दमदार पावसामुळे समाधान लाभले आहे.आतापर्यंत झालेल्या पावसाच्या आधारे जवळपास ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यात जूनमध्ये दमदार पाऊस झाला.मात्र नंदुरबार तालुक्यात पावसाने दांडी मारली होती.त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर आज नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली.

काल सकाळच्या सत्रात पावसाची रिपझीप सुरु होती. मात्र दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. दुपारी १२ ते २ वाजेपासुन पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले होते. या मुसळधार पावसाने काहीसे समाधान व्यक्त केलं जात आहे.

जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या देखील खोळंबल्या होत्या जिल्ह्यात अवघ्या ४० ते ४५ टक्केच पेरण्या पुर्ण झाल्या असुन नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा़र्‍या वीरचक्क धरणात देखील अवघा २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणी टंचाईचे मोठे संकट उभं टाकलं होत. अशातच या पावसामुळे काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गतवर्षीही लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये कमी पर्जन्यमानामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता. अद्यापही अनेक प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अखेर आज झालेला पाऊस सातपुड्यासह सपाटी भागातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर तालुक्यांमध्ये दमदार झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खांडबारा परिसरातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी विसरवाडी पोलीसांच्या जाळ्यात, ४ मोटारसायकली जप्त

Next Post

नंदुरबार जिल्हयात प्रथमच मोफत 110 बालकांची हृदयरोग तपासणी

Next Post
नंदुरबार जिल्हयात प्रथमच  मोफत 110 बालकांची हृदयरोग तपासणी

नंदुरबार जिल्हयात प्रथमच मोफत 110 बालकांची हृदयरोग तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add