बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथील रहिवासी अन्सार यासीन तेली यांच्या राहत्या घरात रात्री नऊ वाजेपासूनच एक सर्प भिंतीच्या आडोशाला लपून बसला होता. त्यामुळे सर्व कुटुंबाने रात्र जागूनच काढली.
सकाळी याबाबत त्यांनी त्याचे मोठे बंधू अनिस तेली ,जलीस तेली यांना सर्व माहिती दिली.त्यांनी लागलीच सर्प मित्राला बोलावण्याचे ठरवले.परंतु सर्प मित्राबाबत कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय पाटील व ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील यांना या घटनेची माहिती दिली .
दत्तात्रय पाटील यांनी लागलीच तळोदा येथे संपर्क साधता.सर्पमित्र प्रेम माळी यांना पाचारण केले. काहीवेळाने सर्प मित्र घटनास्थळी पोचल्याने त्यांनी त्या सर्पाला मोठया शिताफीने पकडले.
व प्लास्टिकच्या ऐका बरणीत ठेवून घेऊन गेले.पुढे जाऊन त्याला जंगलात सोडून देण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.त्यावेळी सर्प पकडला गेल्याचे समजताच घरातील सर्व कुटुंबांनी सुटकेच्या श्वास सोडला. घटनास्थळी इस्माईल तेली, जितेंद्र मराठे ,भैय्या टेलर, इत्तेहार तेली, जुल्फेकार तेली, आतिक तेली, अबुजाण तेली हे उपस्थित होते.