नंदुरबार l प्रतिनिधी
लोकशाही दिनाला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे.
राज्यपाल यांच्या आदेशानुसार लोकशाही दिन तालुका, जिल्हा, व आयुक्त कार्यलयात घेतला जातो
लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारी सोडवण्या साठी विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असते.
गेल्या अनेक वर्षा पासून तालुका व जिल्हास्तरावर लोकशाही दिन एक औपचारिकता म्हणून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
ज्या विभागाच्या तक्रारी असतात ते अधिकारी सुद्धा उपस्थतीत रहात नसल्याने अनेक नागरिकांनी ह्या बाबत मौखिक तक्रारी केल्या असल्या तरी अधिकारी लोकशाही दिनात उपस्थित रहात नसल्याने नागरिकांचा हिरमोड होतो तक्रारीचा निपटारा वेळेवर होत नाही.
नवापूर येथील मंगेश येवले ह्यांचा तक्रारी अर्ज गेल्या आठ वर्षा पासून तालुका व जिल्हा लोकशाही दिनात प्रलंबित असल्याने त्यांनी राज्यपाल यांच्याकडे दांडीबहाद्दर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.