नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय कॉग्रेस पक्षाचे धडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यानीं राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.
धडगांव तालुक्यातील कात्री येथील जयसिंग वळवी,केल्ला वळवी,ठोग्या वळवी,तेजला वळवी यांनी जाहीर प्रवेश केला.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस व्ही.जे.एन.टी प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार, सरचिटणीस मधुकर पाटील,जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी,युवा नेतृत्व रविंद्र वळवी,शहराध्यक्ष नितीन जगताप,
सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,ओबीसी सेल जिल्हा समनव्यक निलेश चौधरी,शहर उपाध्यक्ष पंकज पाटील,उपाध्यक्ष राजा ठाकरे,सोशल मिडीया तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील उपस्थित होते.