शहादा l प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जन्मदिनानिमित्त कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील कृषीदुतांकडून हा दिवस प्रकाशा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंडळ अधिकारी मनोज खैरनार व विजय माळी उपस्थित होते.तसेच कृषी महाविद्यालयाचे प्रा. संदीप पाटील , प्रा.रुपेश पाटील आणि गावातील वरिष्ठ शेतकरी बांधव उपस्थित होते.
या वेळी कृषी मंडळ अधिकारी श्री.खैरनार व श्री.माळी यांनी महाराष्ट्र शासनातर्फे रबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.तसेच कृषी दुतांनी शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले.
त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल, कार्यक्रम समन्वयक प्रा.सी.यु पाटील व कार्यक्रम अधिकारी प्रा.रुपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.