मेष:- उत्तम दिवस आहे. भावाच्या मुलांकडून लाभ होतील. धाडसी निर्णय घ्याल.
वृषभ:- वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. जमिनीची कामे मार्गी लागतील.
मिथुन:- सुखाचा दिवस आहे. भावंड मदत करतील. भौतिक सुखात मात्र कमतरता येईल.
कर्क:- संवाद कौशल्य कामास येईल. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य सुधारेल. विक्री व्यवसायात यश मिळेल.
सिंह:- उत्तम दिवस आहे. कामे मार्गी लागतील. विनाकारण वाद विवाद टाळा.
कन्या:- खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च कराल. व्यसने आणि प्रलोभने टाळा.
तुळ:- स्वतःसाठी खर्च कराल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे. उपासना करा.
वृश्चिक:- सरकार दरबारी वजन वाढेल. शब्दावर नियंत्रण ठेवा. घरात किंवा शेतात कटकटी होऊ शकतात.
धनु:- आध्यत्मिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. विरोधक पराभूत होतील.
मकर:- आरोग्यात सुधारणा होईल. मैदानी खेळात चमक दाखवाल. कुटुंबास वेळ द्याल.
कुंभ:- प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना मात्र काहींशी वाट बघावी लागेल. विरोधक डोके वर काढतील.
मीन:- आर्थिक प्रगतीसाठी चांगला दिवस आहे. वेळ वाया घालवू नका. शुभ कार्यात सहभागी व्हाल.