नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसात तब्बल कोरोनाचे १७ रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सद्याच्या घडीला नंदुरबार जिल्ह्यात २४ ॲडक्टीव रूग्ण आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतांना दिसत आहे. काल दि. २ व ३ जुलै रोजी प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाला. या जिल्हाभरातील पाच तालुक्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. या दोन दिवसात तब्बल १७ कोरोना रूग्ण आढळले आहे. यामध्ये नंदुरबार तालुक्यात ६, शहादा येथे १, तळोदा येथे १, नवापूर येथे ८ तर धडगांव येथे कोरोनाचा एक रूग्ण आढळला आहे.
दोन दिवसात तब्बल १७ रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्याच्या घडीला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा वगळता पाच तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता २४ ऍक्टीव रूग्ण उपचार घेत आहे. कोरोना रूग्ण वाढत असले तरी नागरीकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक चारूदत्त शिंदे यांनी केले आहे.