नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे सुरत महामार्गावरील होटल अँपल समोर साक्री हुन सुरत येथे जाणाऱ्या ट्रक मध्ये वाहतूक होणारी 43 लाखाची बनावट दारू जप्त करण्यात आली यावेळी माल ट्रक सोडून चालक सहचालक पसार झाले.
याबाबत माहिती अशी की , काल दि.१ जुलै दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारीना गुप्त माहीती मिळाली की, धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर माल ट्रक ( क्र. जी.जे.06 ए.झेड.3560) मध्ये विदेशी बनावटीची राँयल विस्की दारुची वाहतूक गुजरात राज्यात होत आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील ,पो.काँ.दादाभाई मासुळे, राजेंद्र काटके जितेंद्र ठाकूर तुषार पाटील, आनंदा पाटील ,
विसरवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी महामार्गावर सापळा रचून मालट्रक अडविले असता ,मालट्रक उभी करून चालक फरार झाला यावेळी ट्रकाची झडती घेतली असता
त्यात विदेशी बनावटची राँयल विस्की ,चे बाक्स मिळवून आले. यावेळी 43 लाखाची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.सदरचा मालट्रक विसरवाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे ,,बनावट दारूची मोठी कारवाई झाल्या मुळे अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले आहे.