नवापूर l प्रतिनिधी
शहरातील आदर्श नगर भागात नागरिक सुविधांचा अभावामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासनाला आदर्श नगरातील नागरिकांनी चार वेळा निवेदन दिली अनेकदा स्थानिक नगरसेवकांना देखील नागरी सुविधा देण्याबाबत विनंती केली.परंतु आजतगायत कुठलीही नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नसल्याने गुरुवारी सकाळी नगरपालिकेत महिलासह मोर्चा काढत मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नळ योजना नसल्याने उन्हाळ्यात या भागातील बोरवेल आटत असल्याने पाण्याची समस्या निर्माण होते. उघड्या आणि अस्वच्छ गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी परिसरामध्ये प्रचंड अंधार असतो पथदिवे देखील बंद असतात. रस्त्याचा पत्ता नाही ठिकठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते पक्के रस्ते तयार करावे. या भागातून मार्गस्थ होण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.
आदर्श नगरातील तीन ठिकाणी ओपन प्लेस आहे.या ठिकाणी पथदिवे व सुशोभीकरण व ओपन जिम करून वॉल कंपाऊंड करण्याची मागणी करण्यात आली. या भागातून हायटेन्शन विद्युत तारा गेल्याने ते काढण्याबाबत देखील सांगितले आहे.
एका बालकाला विजेच्या शाॅक लागला आहे. विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले असून पालिकेने आदर्श नगरातील सुविधा देण्यासाठी आदर्श नियोजन करण्याची गरज आहे.
कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी वेळेवर उपलब्ध होण्याची मागणी करण्यात आली आहे. नळ, रस्ते, गटार, पथदिवे या भौतिक सुविधांकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
निवेदनावर ॲड. आर बी कुलकुर्णी, प्रशांत भट,सागर मिस्तरी,भास्कर मोरे, सुदाम बोरसे, मच्छिंद्र मिस्तरी,प्रशांत भट,भटू बंजारा, विठ्ठल गिरासे, दिलीप राजपूत,रमेश पाटील, नाजकचंद अग्रवाल,अशोक चौधरी,ॲड. सुनिता कुलकुर्णी, रेखा चौधरी, उर्मिला मोरे,
पूनम राजपूत,पुष्पांजली पवार,विजया नगराळे,लविना चंदने,राजश्री मिस्तरी,रत्ना रामोळे, शोभा बोरसे,ज्योती पाटील,अरूणा मोरे,मिनाक्षी भट, सुषमा पाटील, काजल घोडसे, सुनिता कुलकुर्णी,जयश्री चव्हाण,पुजा जाधव,वैशाली पाटील, योगिता वळवी आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.








