Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील 5 इसम 2 वर्षांसाठी जिल्ह्यातुन हद्दपार

team by team
June 28, 2022
in क्राईम
0
जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना: पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा याकरीता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील एकुण 5 इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 च्या प्राप्त अधिकारान्वये नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेले आहे . हद्दपार करण्यात आलेले सर्व 5 इसम हे शहादा तालुक्यातील आहेत .

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती घेतली .

त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता शहादा , म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करुन नियमितपणे मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे त्यांचे निदर्शनास आले .

त्यांच्यापासून सामान्य नागरिकांच्या मालमत्तेस व जिवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे त्यांना आढळून आले . त्याप्रमाणे अशा आरोपीतांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते .

शहादा व म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील 5 इसमांविरुध्द् मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत . त्यावरुन म्हसावद पोलीस ठाणेकडून एक टोळीस हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला .

सदर हद्दपार प्रस्तावाचा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी आढावा घेवुन प्रस्तावाची छाननी केली . तसेच योग्य ती कायदेशीर प्रकिया पाडून 5 इसमांना 02 वर्ष कालावधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी दिले आहेत . टोळीतील हद्दपार इसमांची नांवे योगेश कृष्णा पवार वय 25 रा . सुलवाडे पो . सुलतानपूर ता . शहादा, अजय आंबालाल मोरे वय -24 रा . सुलवाडे पो . सुलतानपूर ता . शहादा, सोमनाथ काशिनाथ दशरथ रा . सुलवाडे पो . सुलतानपूर ता . शहादा, आकाश राजु शेमळे वय 20 रा . सुलवाडे पो . सुलतानपूर ता . शहादा, अजय ऊर्फ टायगर राजेंद्र पावरा वय -22 रा . ब्राम्हणपुरी ता . शहादा अशी आहेत .

हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर 48 तासाचे आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघुन जाणेबाबत आदेश देण्यात आले आहेत .

तसेच हद्दपार इसमांनी नंदुरबार जिल्ह्यात येतांना मा . पोलीस अधीक्षक , नंदुरबार व मा . न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे . हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द् प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल . तसेच वरील 5 हद्दपार इसम नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसुन आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार येथे कळवावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

दुर्गम भागात अधिकृतरित्या मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांना सहकार्य करण्याची जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची सूचना

Next Post

खबरदार : जिल्हा रुग्णालयात जातांना ही चूक केल्यास मिळेल ५०० रुपये दंड

Next Post
खबरदार : जिल्हा रुग्णालयात जातांना ही चूक केल्यास मिळेल ५०० रुपये दंड

खबरदार : जिल्हा रुग्णालयात जातांना ही चूक केल्यास मिळेल ५०० रुपये दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add