Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची पंढरी : धुळ्यातील ग्रंथ भवन

Mahesh Patil by Mahesh Patil
June 27, 2022
in शैक्षणिक
0
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची पंढरी : धुळ्यातील ग्रंथ भवन

समाजाच्या जडण- घडणीत ग्रंथ आणि ग्रंथालयांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे राज्य शासन राज्यातील नागरिकांना ग्रंथालय सेवा देण्यास कटिबद्ध आहे. ‘गाव तेथे ग्रंथालय’ हे शासनाचे घोषवाक्य आहे. याच घोषवाक्यानुसार धुळे येथे भव्य- दिव्य ग्रंथ भवन आकारास आले आहे. त्याविषयी थोडे..

धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या काठावर उत्तरेच्या बाजूला असलेली पांढऱ्या शुभ्र रंगातील एक विस्तीर्ण इमारत अलिकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अगदी अमेरिकेच्या व्हाइट हाऊससारख्या दिसणाऱ्या या इमारतीजवळ गेले की या इमारतीची भव्यता आणखी मोठी होते. या इमारतीचे नाव आहे ग्रंथ भवन. अर्थात जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकाऱ्यांचे हे कार्यालय आणि ग्रंथालय. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची हक्काची अभ्यासिका.

शासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा असो, की अखिल भारतीय स्तरावरील नागरी सेवा परीक्षा. अनेक तरुण- तरुणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करियर निवडीत आहेत. धुळे जिल्ह्यातून सन 2018 मध्ये एकाच वर्षी पाच जणांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेसाठी निवड झाली होती.

त्यानंतर यंदाही धुळे जिल्ह्यातील दोन तरुणांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्यामुळे अनेक तरुण- तरुणी स्पर्धा परीक्षा देताना दिसत आहेत. एवढेच नव्हे, तर हे तरुण- तरुणी अभ्यासिका, ग्रंथालये, वाचनालयांमध्ये जावून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना दिसत आहेत. धुळे शहरातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. हे ग्रंथ भवनातून भविष्यात निश्चितच चांगले अधिकारी घडतील यात शंकाच नाही !

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथांची पुस्तकांची उपलब्धता व्हावी, त्याचबरोबर वाचन संस्कृती वृद्धिंगत होवून नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून धुळे येथे 1996 मध्ये धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची स्थापना झाली.

सुरवातीला या कार्यालयाची इमारत भाडेतत्वावर होती. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून धुळे शहरात पांझरा नदीच्या काठावर ग्रंथालयाची प्रशस्त इमारत साकारली आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून या ग्रंथालयासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च आला आहे. त्यासाठी तत्कालिन पालकमंत्री दादाजी भुसे व तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे.

या ग्रंथालयात तळ मजल्यावर तीन आणि पहिल्या मजल्यावर तीन असे सहा कक्ष आहेत. त्यापैकी एका कक्षात सभागृह साकारले आहे. या सभागृहात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी स्वत:हून चालू घडामोडींवर आधारित विषयांवर गटचर्चा घडवून आणतात.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुलभ अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एका वेळेस तब्बल साडेतीनशे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करु शकतात. पांझरा नदी काठावरील शांततामय वातावरणात अभ्यास करून अनेक तरुण- तरुणी आज शासनात विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यात तलाठ्यापासून पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचा समावेश आहे.

ग्रंथालयात येणाऱ्या अनेक तरुणांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे ते स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ किंवा पुस्तकांची खरेदी करू शकत नाही.

तसेच या तरुणांना अभ्यासासाठी पोषक असे वातावरण घर किंवा घराच्या आजूबाजूला मिळू शकत नाही. त्यामुळे अशा अनेक तरुणांना ग्रंथालयाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रंथालयातील शांततामय वातावरणात स्पर्धा परीक्षा देणारे तरुण आपापल्या पाहिजे ते संदर्भ ग्रंथ, पुस्तके नि:शुल्क अभ्यासू शकतात. त्यामुळे ग्रंथ भवन हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

ग्रंथालयात 72 हजार ग्रंथ संपदा

धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालयातील अभ्यासिका वर्षभर विद्यार्थ्यांसाठी खुली असते. या ग्रंथालयाने सुट्टी पाहिलेली नाही. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत ग्रंथालयातील वर्दळ कायम सुरू असते. या ग्रंथालयात विविध विषयांवरील तब्बल 72 हजार ग्रंथ आहेत.

त्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण- तरुणींसाठी 12 हजारांवर पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयातूनच पुस्तके घ्यायची आणि तेथेच वाचन करून अभ्यास, नोट्स काढायच्या असा दिनक्रम या ग्रंथालयात येणाऱ्यांचा आहे.

याशिवाय ग्रंथालय येणाऱ्या दैनंदिन वाचकांची संख्या सुद्धा पाचशेच्यावर असून 1568 ग्रंथालयाचे सभासद आहेत. या सर्व परिसरावर निगराणी ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्हा शासकीय ग्रंथालयाने काळाची पावले ओळखत स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रंथालयातर्फे ई- बुक रिडर्सची सुविधा उपलब्ध आहे. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यास मदत होत आहे.

याशिवाय धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना करण्यास प्रोत्साहन देणे, त्यांचे संघटन व विकास करणे, सार्वजनिक ग्रंथालयांना शासनमान्यता प्रदान करणे,

तदर्थ व परीरक्षण अनुदान देणे, ग्रंथालय चळवळीच्या प्रोत्साहनार्थ योजना तयार करणे, जिल्हा, तालुका व ग्रामपातळीपर्यंत ग्रंथालय सेवांचे जाळे निर्माण करणे, शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासास उत्तेजन देणे, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांद्वारे सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसाहाय्य पुरविण्याचे देखील कार्य केले जाते.

“धुळे येथे जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी यांचे कार्यालय अर्थात ग्रंथ भवन इमारतीची निर्मिती झाली आहे. या इमारतीच्या देखभालीसाठी अभ्यासिकेत येणारे विद्यार्थीही सहकार्य करतात. तसेच याकामी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.”
– जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, धुळे

बातमी शेअर करा
Previous Post

दोंडाईचातील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे महिला आयोगाचे आदेश

Next Post

स्विफ्ट कार उलटल्याने अपघात, एक ठार

Next Post
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

स्विफ्ट कार उलटल्याने अपघात, एक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group