नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य संस्थाचालक महामंडळाच्या झालेल्या जनरल सभेत राजेंद्र कृष्णराव गावित यांची राज्य कार्यकारनी वर प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने नंदूरबार येथे जिल्हा संस्थाचालक खजिनदार भास्करराव पाटील यांनी सपत्नीक सत्कार केला.

पुणे येथील खंडोबा प्रतिष्ठान बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य संस्थाचालक महामंडळाच्या जनरल सभेत राज्य महामंडळावर विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यात खा.सुप्रिया सुळे यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर नंदूरबार जिल्ह्यातून राज्य कार्यकारणी वर प्रतिनिधी म्हणून राजेंद्र कृष्णराव गावित यांची निवड करण्यात आली.
सदर सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यात पवित्र पोर्टल बंद करण्याबाबत, वेतनेतर अनुदान तसेच गुणवत्ता वाढ याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सदर सभा विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी नंदूरबार जिल्ह्यातून खजिनदार भास्करराव पाटील सचिव युवराज पाटील , नाशिक विभाग समन्वयक एन डी नांद्रे संस्था चालक संघटनाहे उपस्थित होते.
त्यानिमित्त नंदूरबार येथे राजेंद्र गावित यांची निवड झाल्याबद्दल भास्करराव पाटील यांनी सत्कार केला यावेळी भालेर येथील माजी सरपंच सौ.बेबिबाई पाटील, अनिल कुवर, पर्यवेक्षक,पी डी पाटील, निखिल पाटील उपस्थित होते.








