Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील राजकीय नाट्याचा नंदुरबार असा बसला फटका

team by team
June 23, 2022
in राजकीय
0
विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन 21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीतील कोरोनाविषयक खटले मागे

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यात सद्यास्थितीत राजकीय नाट्य घडत आहे.यात नंदूरबार जिल्ह्यात शांतता असली तरी या नाट्याचा फटका अधिकाऱ्यांना बसला आहे. सातपुड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोयीसाठी धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात आले आहे.

याची १६०० निवासी क्षमता आहे.या स्कूलचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत दि.२४ जून रोजी करण्याचे आयोजन होते.दरम्यान राजकीय नाट्यामुळे अचानक काल दुपारी अधिकाऱ्यांना स्कूलचे उद्घाटन होणार असल्याचा निरोप आला व अवघ्या अर्ध्या तासात इंटरनॅशनल स्कूलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

सातपुड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोयीसाठी
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात आले आहे.

याची १६०० निवासी क्षमता आहे. २०१७ पासून इमारत तयार असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.मार्च महिन्यातच काम पूर्ण झाल्यानंतर सदर इमारत प्रशासनाने ताब्यात घेतली होती. त्यानुसार सद्यस्थितीत १ हजार ६८ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

या इमारतीचे उद्घाटन सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचे नियोजन होते. तशा सूचना यंत्रणेला देखील मिळाल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्र्यांना येणे शक्य नसल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते दि.२४ जून रोजी करण्यात येणार होते.

शिक्षणमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे तयारी देखील करण्यात येत होती. मात्र राज्यात गेल्या दोन दिवसात राजकीय नाट्य घडत आहे याचा परिणाम म्हणून काल २२ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अचानक अधिकाऱ्यांना इंटरनॅशनल स्कूलचे ऑनलाईन उद्घाटन सोहळा अर्ध्या तासात पार पडणार असल्याचा निरोप आला.

त्यामुळे अधिकारी गोंधळले अशातच पुढील अर्ध्या तासात इंटरनॅशनल स्कूलचे ऑनलाईन उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच सदर ऑनलाईन उद्घाटन सोहळा पार पडला.

प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह जि.प.पदाधिकारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा
Previous Post

विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन 21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीतील कोरोनाविषयक खटले मागे

Next Post

नंदूरबार तालुक्यात वादळी वाऱ्यामूळे सहा एकर केळी बागेचे नुकसान, घराची पत्रे ही उडाली

Next Post
नंदूरबार तालुक्यात वादळी वाऱ्यामूळे सहा एकर केळी बागेचे नुकसान, घराची पत्रे ही उडाली

नंदूरबार तालुक्यात वादळी वाऱ्यामूळे सहा एकर केळी बागेचे नुकसान, घराची पत्रे ही उडाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add