नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड येथरील विद्या गौरव प्रायमरी स्कूल वस्तीगृह फोडून चोरट्याने पंखे, वॉशिंग मशिनसह स्कुल बसची बॅटरी असा २२ हजार रुपये किंमतीचे साहित्य लंपास केले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील आमलाड येथे विद्या गौरव प्रायमरी स्कूलचे वस्तीगृह आहे. सदर वस्तीगृहाच्या खोलीच्या मागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
यावेळी खोलीतील २२ हजार रुपये किंमतीचे आठ पंखे, दोन वॉशिंग मशिन व शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या स्कूल बसची बॅटरी असे साहित्य चोरुन नेले.
याबाबत विश्वास भाईदास पवार यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दिलीप साळवे करीत आहेत.








