Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस केल्यास गुन्हा दाखल होणार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
August 12, 2021
in राष्ट्रीय
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
नंदुरबार ! प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही व राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता  नागरिकांनी घ्यावी, प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस प्रतिबंध करावा.असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
जनतेच्या वापरासाठी छोट्या कागदी राष्ट्रध्वजाचा उपयोग करण्यात यावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झाले असतील तर त्याचा योग्य मान राखून ध्वज संहितेतील तरतूदीनुसार नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस प्रतिबंध करावा. अशी विक्री होताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 कलम 2 नुसार कार्यवाही करावी. सर्व  जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळी, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, कनिष्ठ महाविद्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये आणि पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टिक ध्वजाच्या वापरास पायबंद घालावा.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वातंत्र्य दिनाचा संपुर्ण कार्यक्रम सामाजिक अंतराचे नियम पाळून तसेच कोरोना विषाणूच्या संदर्भातील केंद्र व राज्य शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाने पालन करून संपन्न करावा. याची  संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल असे परिपत्रकात नमूद करण्यात  आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

Next Post

रायंगण येथे आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Next Post
रायंगण येथे आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान

रायंगण येथे आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add