तालुक्यातील मौजे रायंगण येथे काल दि.११ रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास दिनकर देवदान मावची यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने अन्न धान्य, ढोरांसाठीचा चारा जळून खाक झाला. तसेच म्हैस, बैल हे पण काही प्रमाणात भाजले गेले आहेत. यात सुमारे १ लाख ५ हजाराचे नुकसान झाले आहे.
रायगण गावाचे सरपंच नवलसिंग गावीत यांनी नवापूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंब बोलावल्याने आग विझविण्यात आली. तो पर्यंत रायंगण गावाचा ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचे काम केले.
घटनास्थळी आ.शिरीषकुमार नाईक यांनी रायंगण गावात येऊन दिनकर मावची यांची भेट घेतली तसेच घराची पाहणी केली. तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. यानंतर तलाठी गणेश बेदरकर यांनी घराचा पंचनामा केला. आगीत अंदाजे १ लाख ५ हजाराचे नुकसान झाले आहे. यावेळी उपसरपंच सुमाताई गावीत,अनिल गावीत,अतुल ठिंगळे,सुशिल गावीत,महेद्र गावीत यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यास मदत केली.
श्री.महेश शांताराम पाटील
9404747458
At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458