नंदूरबार | प्रतिनिधी
ओ.बी.सी. इंम्पेरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू असुन या पध्दतीमध्ये त्वरीत आवश्यक बदल करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस बापू महाजन, प्रदेश सरचिटणीस एन.डी.पाटील,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल नंदुरबार जिल्हातर्फे इंम्पेरीकल डाटा संदर्भातील निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,अनुसरून समर्पित आयोगामार्फत ओ.बी.सी. इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू आहे. तरी हे काम ज्या पध्दतीने सरू आहे, ही पध्दत अतिशय चुकीची असून त्यामुळे ओ.बी.सी समाजावर प्रचंड अन्याय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे . आडनावावरून जात ठरवणे शक्यच नाही . पुढील अनेक पिढयांचे नुकसान होणार आहे .
ओ.बी.सी.इम्पेरिकल डेटा तयार करण्याची पध्दत सदोष आहे म्हणुन ओ.बी.सी इंम्परिकल डेटा तयार करण्याच्या पध्दतीमध्ये त्वरीत आवश्यक बदल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल नंदुरबार जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र निकम, जिल्हा चिटणीस अरविंद पाटील,शहादा शहाराध्यक्ष आकाश शिंपी आदी उपस्थीत होते.








