तळोदा l प्रतिनिधी
उपजिल्हा रुग्णालय तळोदा इथे नवजात शिशु तसेच प्रसूती झालेल्या महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने याची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली .
ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्ण ची सोय होण्यासाठी या रुग्णालय ला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला इमारत उभी राहिली मात्र मनुष्यबळ ची कमतरता दिसून येत आहे अनेक पदे इथे रिक्त आहेत.
मंगळवारी रात्री १०: ३० चा सुमारास उपजिल्हा रुग्णालय तळोदा इथे आठ महिला आपल्या नुकत्याच जन्मलेल्या नवजात बालक सोबत
शिशु म्हणून उपजिल्हा रुग्णालय मुक्कामी होते .
मात्र रात्री १०:३०. वाजता वीज गेल्याने मातांना त्यांचा नवजात बालकांना असह्य उकाडा सहन करावा लागला या बाबत एक व्हिडिओ आमदारांना पाठवून उपजिल्हा रुग्णालयात सद्य स्थिती काय आहे याची माहिती अवगत करून तक्रार करण्यात आली याची दखल घेत.
आमदार राजेश पाडवी यांनी अचानक संध्याकाळी ७:३० चां सुमारास भेट दिली या वेळी त्यांना रुग्णांची भेट घेवून विचारपूस केली. या बाबतीत पाणी व वीज बाबत अत्यंत विदारक स्थिती दिसून आली. दरम्यान या वेळी त्यांनी कर्मचारी ची चांगलीच झाडा झडती घेतली.
जनरेटर कुचकामी –
दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास ऑपरेशन थिएटर मध्ये अडचण येवू नये म्हणून ठेवण्यात आले असले तरी नियमीत ऑपरेशन होत नसल्याने इतर वेळी रुग्णाचा खोलीत वीज पुरवठा देणे आवश्यक अपेक्षित असताना असे का होते या बाबत आमदार राजेश पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली.
वरिष्ठांना संपर्क साधून केली तक्रार – दरम्यान आमदार राजेश पाडवी यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा वास्तव स्थिती ची माहिती देवून भेट देवून पाहणी करण्याची मागणी केली तसेच इतर सुविधा उपलब्ध करणे बाबत मागणी केली.