Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुव्यातील घटनेच्या धर्तीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे सशस्त्र पथसंचलन, 28 जणांना अटक

team by team
June 12, 2022
in क्राईम
0
अक्कलकुव्यातील घटनेच्या धर्तीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे सशस्त्र पथसंचलन, 28 जणांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुव्यातील घटनेच्या धर्तीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अक्कलकुवा शहरात सशस्त्र पथसंचलन काढण्यात आले असून, याप्रकरणी आतापर्यंत एकूण 28 जणांना अटक करण्यात आली आहे.

दि.10 जून 2022 रोजी अक्कलकुवा गावातील राहणारा हरीष पवार नावाच्या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्ॲप स्टेटसवर एका आक्षेपार्ह मजकुरासह फोटो प्रसारीत केला . त्यामुळे एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या गेल्यामुळे काही लोक अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आले असता पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला .

परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले लोक घरी जात असतांना त्यातील काही समाजकंटकांनी अक्कलकुवा शहरातील काही घरांवर दगडफेक केली तसेच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले होते . त्याअनुषंगाने अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे दगडफेक करुन दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करुन आजतागायत 28 आरोपीतांना अटक करण्यात आली असून

अक्कलकुवा शहरात सद्या शांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे . तरी देखील नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी अक्कलकुवा शहरातील नागरिकांच्या मनातील भिती नाहिशी व्हावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने

दि. 12 जून 2022 रोजी अक्कलकुवा शहरात विशेषत : महत्वाचे भागात पोलीसांनी सशस्त्र संचलन केले . अक्कलकुवा शहरात पोलीसांनी केलल्या सशस्त्र सचलनाचे नेतृत्व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले तर त्यांच्या सोबत अपर पोलीस अधीक्षक विजय पवार ,

उप विभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा संभाजी सावंत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा , तळोदा , मोलगी , विसरवाडी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार तसेच राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ) धुळे येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार उपस्थित होते .

सकाळी 11 वाजता पोलीसांच्या सशस्त्र संचलनाची सुरुवात अक्कलकुवा पोलीस ठाणे येथून तळोदा नाका , आमलीबारी फाटा , संजय नगर , मुख्य बाजार पेठ , झेंडा चौक , हनुमान चौक , परदेशी गल्ली , बस स्थानक व तेथून पुन्हा अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सशस्त्र संचलन समाप्त करण्यात आले .

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांतर्फे दुसऱ्या दिवशीही गाव बंद

Next Post

अंगावर झाड पडल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post
अंगावर झाड पडल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अंगावर झाड पडल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add