तळोदा l प्रतिनिधी
भवरकडून खर्डी नदी मार्गे तळोदाकडे दुचाकीवरून येणाऱ्या कळमसर मोहिदा येथील ४० वर्षीय इसमाचा अंगावर झाड उन्मळून पडल्याची घटना घडली, दरम्यान यात तरुण बाल बाल बचावला असून त्याला हाता पायाला मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोद्यात पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की, रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली.
दुचाकीवरून भवरकडून खर्डीनदी मार्गे तळोदाकडे येणाऱ्या रवींद्र गुलाब ठाकरे (वय ४० ) रा. कळमसर मोहिदा हा तरुण कामे आटपून तळोदाकडे येत असताना अचानक त्याच्या दुचाकीवर झाड कोसळले या घटनेत चालक झाडाखाली अडकून पडला होता.
दरम्यान झाड कोसळल्याचा आवाज झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. रस्त्यावर जाणारे प्रवासी व जवळच असलेले धाणकावाडा येथील नागरिकांची धावपळ केली. झाडाखाली सापडलेले दुचाकीवरून त्या तरुणास बाजूला काढले व त्यास रुग्णवाहिकेला प्राचारण करून तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.