नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील सैताने येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलची बिनविरोध निवड झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची बिनविरोधची परंपरा कायम आहे.
नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक घेण्यात आले. या निवडणुकीत १३ पैकी १० जागांवर शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
त्यात सखाराम पाटील, शशिकांत गोसावी, निंबा पाटील, यमुनाबाई पाटील,सदाशिव पाटील, वंदनाबाई पाटील,राम पाटील, शशिकांत पाटील,आण्णा पाटील, आसाराम भिल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणुकीची प्रक्रिया घेण्यात आली. त्यात सखाराम आत्माराम पाटील यांची चेअरमन तर शशिकांत नथ्थु गोसावी यांची व्हा.चेअरमनपदी निवड झाली.
विजय झालेल्या उमेदवारांच्या सत्कार आमदार कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच दशरथ पाटील विकास चे माजी चेअरमन चतुर पाटील, गोरख पाटील ,आनंदा पाटील, प्रमोद पाटील, नाना पाटील,बन्सीलाल पाटील,संजय पाटील,अशोक पाटील, भगवान पाटील,नाना गोसावी,रवींद्र वसईकर,बारकू पाटील उपस्थित होते.