नंदुरबार | प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र , कोळदा ता.जि.नंदुरबार येथे कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) व कृषि विज्ञान केंद्र , नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले .
यावेळी कृषि विज्ञान केंद्र , कोळदा ता.नंदुरबार येथील डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील , कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे , प्रमुख विभागीय विस्तार केंद्राचे डॉ.एम.एस.महाजन , डॉ.हेडगेवार सेवा समितीचे सल्लागार ललीत पाठक , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे आदी उपस्थित होते . रानभाजी महोत्सवामध्ये प्रस्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले . यावेळेस नंदुरबार जिल्ह्यात रानभाज्या मुबलक प्रमाणात असुन त्यावर विक्री व्यवस्थापन साखळी व प्रक्रिया उद्योग उभी करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले , रानभाज्या महोत्सव सारख्या कार्यक्रमातुन रानभाज्या संकलन व संवर्धनाचे कार्य वाढीस लागते असेही त्यांनी व्यक्त केले . कृषि विज्ञान केंद्र , नंदुरबार चे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी जैवविविधता संवर्धनाचे महत्व सांगितले.नंदुरबार जिल्ह्यातील रानभाज्या तसेच जैवविविधता यातील प्रयोगांची मांडणी केली . प्रयोगशील शेतकरी रामसिंग वळवी , कंजाला ता.अक्कलकुवा यांनी स्थानिक स्तरावर रानभाज्या महोत्सवाची उपयुक्तता सांगितली . विभागीय विस्तार केंद्राचे डॉ.मुरलीधर महाजन यांनी सद्यास्थितील पिक व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच बदलत्या हवामानाची परिस्थितीत पिक व्यवस्थापनात आवश्यकते बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . त्यानंतर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे यांनी रानभाज्या म्हणजे सुपोषणाचे वरदान असुन रानभाज्यांचा आहारात समावेश करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले . अध्यक्षीय भाषणात कृष्णदास पाटील यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन शेतीच्या विकासासाठी विविध उपक्रम चालु असल्याचे व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसारासाठी संलग्न विभागांशी समन्वय साधुन अधिकाधिक तंत्रज्ञान प्रसाराचे काम करण्याबाबत आशावाद व्यक्त केला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि विज्ञान केंद्र , कोळद्याचे जे.एन.उत्तरवार व आभार प्रदर्शन पी.सी.कुंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी , नवापुर बापु गावीत , प्रभारी तालुका कृषि अधिकारी , नंदुरबार स्वप्नील शेळके , तंत्र अधिकारी व्ही.डी.चौधरी आदींनी प्रयत्न केले . रानभाजी महोत्सवामध्ये रानभाज्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . सहभागी ११ बचत गटातील ४२ पुरुष व महिलांना सहभाग प्रमाणपत्र व रानभाजी पुस्तिका देण्यात आले . यावेळी बांबु पासुन कमी खर्चाचे सोलर ड्रायर बनविणार्या कंजाला ता.अक्कलकुवा येथील सायसिंग वळवी यांना गौरवण्यात आले . कृषि विज्ञान केंद्र , कोळदा प्रक्षेत्रावरावरील विविध प्रात्यक्षिकांना व रानभाजी प्रदर्शनास मान्यवरांनी भेटी दिल्या .