Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शनिमांडळ, तलवाडे, तिलाली सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी

team by team
June 6, 2022
in राजकीय
0
शनिमांडळ, तलवाडे, तिलाली सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, तिलाली विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूकीत भाजपा पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनल व शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होती.

निवडणूक चुरशीच्या वातावरणात पार पडली होती.सोसायटीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. काल दि.5 जून रोजी लागलेल्या निकालानंतर सर्व १३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले.

नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनल तर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने निवडणूक लढविली.

एकूण ६८० इतके मतदान झाले होते. मतदानानंतर निकाल हाती आला असता शिवसेनेचे सर्व १३ उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. सदर विकासोची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.

यात शिवसेनेने बाजी मारली असून दिलीप विठ्ठल घुगे, नामदेव परशराम पाटील, भावराव साहेबराव पाटील, संतोष खंडू पाटील, हिंमत सहादू पाटील, हिरामण शत्रृघ्न माळी, ठाणसिंग भिका राजपूत, सरदारसिंग चतूर राजपूत,

उषाबाई वसंत पाटील, हिराबाई शांतीलाल पाटील, शिवाजी दशरथ पाटील तसेच कृष्णा पंडीत धनगर, सुरेश वामन ठाकरे हे सदस्य निवडून आले. निकालाअंती शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

यासाठी शिवसेना नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, जि.प.सदस्य डॉ.सयाजीराव मोरे, प्रविण पाटील, पं.स.सदस्य जितू पवार, सरपंच योगेश मोरे, सरपंच मधुकर पाटील, माजी सरपंच डॉ.सी.पी.सावंत आदींनी परिश्रम घेतले. शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र गिरासे यांनी सदरची माहिती दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जून राशिभविष्य

Next Post

पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

Next Post
पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add