तळोदा l प्रतिनिधी
तालुक्याच्या उत्तर परिसराला बुधवारी वादळसदृश वाऱ्याचा जोरदार दणका बसला. यामध्ये सितपावली या गावात पडझड झाली असून घराची पत्रे उडाले असून 6 वर्षीय बालिका व आई यात जखमी झाली आहे, वाऱ्यामुळे बुधवारी सायंकाळपासूनच परिसरातील वीज गायब झाली होती.
अचानक दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले हाेते. दिड वाजण्याच्या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढला आणि वादळसदृश वारे वाहू लागले. वाऱ्यामुळे सितपावली परिसरातील घरांना वाऱ्याचा फटका बसला. गावात राहणारे गोविंद तुंबऱ्या ठाकरे वादळात त्यांच्या घरांवरील कौले-पत्रे उडाली.

वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. या प्रकारात वारा वादळामुळे लाकूड बालिकेच्या अंगावर पडणार होते. आईच्या प्रसंग अवधनामुळे 6 महिन्याची बाळ वाचवले आहे. आईला हाताला मुक्का मार बसला असुन बालक देखील यात किरकोळ जखमी झाले आहे.
सदर कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वादळी वाऱ्यामुळे घर कोसळल्यामुळे त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. परिणामी तीन मुलांसह जावे कुठे असा प्रश्न पडला असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्यांना निवार्याची शोधाशोध करावी लागणार आहे.
सदर घटनेची माहिती कळताच आमदार राजेश पाडवी यांच्या सूनचेवरून ग्रामपंचायत बंधारा अंतर्गत येत असलेल्या मौजे सितापावली या गावाला भेट देण्याचा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या, त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी गावात जाऊन गोविंद तुंबड्या ठाकरे यांच्या घराची पाहणी केली.
व आदिवासी मोर्चाच्या वतीने या संकटग्रस्त कुटुंबाला ५ हजार हजार रुपयेची आर्थिक मदत देण्यात आली आहे. याप्रसगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शहादा तळोदा विधानसभा प्रभारी, नारायण ठाकरे,भाजपा तालुका अध्यक्ष- प्रकाश वळवी, प.स.सदस्य विक्रम पाडवी,आदिवासी मोर्चा जि.उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी-दारासिंग वसावे, शक्ती केंद्र अध्यक्ष विक्रम वळवी, माजी सरपंच जयवंत पाडवी, विजय पाडवी, ग्रा.प.सदस्य, ईश्वर पाडवी, दारासिंग ठाकरे, हेमशा ठाकरे आदीजण यावेळी उपस्थित होते.








