नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथे खंडणी मागणारी महिला व तथाकथीत पत्रकाराविरुध्द् गुन्हा दाखल असताना नंदूरबार येठीही असाज प्रकार घडला होता.त्यामुळे बांधकाम व्यवसायीक यांच्या तक्रारीवरून खंडणी मागणारी महिला व तथाकथीत पत्रकाराविरुध्द्
आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा पोलीस ठाणे येथे अश्लील व्हिडीओ कॉल करणारी महिला तथाकथीत पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात ( चौधरी ) रा . दत्त कॉलनी , कोरीट रोड , नंदुरबार व पोलीस नामे छोटुलाल तुमडु शिरसाठ रा . सदाशिव नगर , शहादा ता . शहादा यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 384,385 , 389,363 , 323 , 504,506,34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 ( सी ) , 66 ( डी ) अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीत अश्लील व्हिडीओ कॉल करणारी महिला, तथाकथीत पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात ( चौधरी ), पोलीस हवालदार छोटुलाल तुमडु शिरसाठ यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाकडून 7 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी आवाहन केले होते की , अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ कॉल करुन व बदनामी करण्याची भिती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील अशा नागरिकांनी कसलीही भिती न बाळगता समोर येवून पोलीस ठाण्याला तक्रार द्यावी .
तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल . नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दि. 2 जून रोजी नंदुरबार शहरातील 41 वर्षीय बांधकाम व्यवसायीक यांना देखील सदर महिला , तिच्या आणखी दोन महिला साथीदार व तथाकथीत पत्रकार यांनी दोन महिण्यापुर्वी छेडखानी व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देवून 5 लाख रुपयांची खंडणी मागीतली होती .
त्यामुळे तक्रारदार हे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आले असता त्यांच्या तक्रारीवरुन सदर महिला , तिच्या आणखी दोन महिला साथीदार व तथाकथीत पत्रकार यांच्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात यभा.द.वि. कलम 385,120 ( ब ) 341 , 504 , 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

नंदुरबार तसेच इतर राज्यातील नागरीकांना पुन्हा आवाहन करण्यात येते की , अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ कॉल करुन व बदनामी करण्याची भिती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील अशा नागरिकांनी कसलीही भिती न बाळगता समोर येवून पोलीस ठाण्याला तक्रार द्यावी . तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल . असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले.








