नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाली गावाजवळील एक हॉटेलसमोरुन चोरट्याने साडेतीन लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन लंपास केले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील खापर येतील योगेश दयानंद पवार यांच्या मालकीचे साडेतीन लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन (क्र.एम.एच.४६ ए ३४५६) गव्हाळी गावाच्या गावाजवळील एका हॉटेल समोरुन चोरट्याने चोरुन नेले.
याबाबत योगेश पवार यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.निलेश वसावे करीत आहेत.








