तळोदा l प्रतिनिधी
मुनिंदर धर्मार्थ ट्रस्ट हरियाणा अन्वये संत रामपाल जी महाराज यांच्या आदेशानुसार हर घर पुस्तक या योजनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गाव,खेडे,शहर, तसेच डोंगराळ भागातील गावापर्यंत पुस्तक सेवेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर पुस्तक सेवेसाठी मुनिंदर धर्मार्थ ट्रस्ट हरियाणा यांच्याकडून जगत गुरू रामपाल महाराज यांच्या अनमोल अशा ग्रंथांनी समृद्ध अशी बस पाठविण्यात आली होती.
सोबत या मेघा सेवेसाठी सेवा देणाऱ्या अनुयायांना प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ह्या बसचा मोठा उपयोग झाला.
प्रत्येक तालुक्यानुसार काही दिवसांची ही सेवा आयोजित करण्यात आलेली होती.ज्यामध्ये २०० पेजेस असणाऱ्या पुस्तकाची किंमत अवघी १० रुपये ठेवण्यात आली होती.यामागील उद्देश म्हणजे १० रुपये दिल्यानंतर निदान आपण पैसे खर्च केले आहेत या भावनेतून ग्रंथ घेणारे ते ग्रंथ वाचतील नाहीतर मोफत दिले असते तर त्यांना त्या ग्रंथाचे महत्व कळणार नाही.म्हणून किंमत नाममात्र ठेण्यात आली होती.
बस मध्ये ट्रस्ट कडूनच सेवा देणाऱ्या आनुयायांसाठी भोजनासाठी लागणारी सामग्री पाठविण्यात आली होती.पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्यामुळे बसच्या इंधनाचा खर्च व भोजनाचा खर्च हा जर विचार केला तर ट्रस्टची ही निस्वार्थ सेवा आहे हे सहज लक्षात येत होते.
सेवा देणाऱ्यांकडून ग्रंथ घरापर्यंत पोहचवून समाजाला मग तो कुठल्याही समाजाचा, धर्माचा असो त्यांना खऱ्या ज्ञानाचा परिचय व्हावा म्हणून ही विशाल अशी ग्रंथ सेवा आयोजित करण्यात आलेली होती. या ग्रंथ सेवेसाठी जिल्हाभरातून अनेक अनुयायांनी आपली नाव नोंदणी केलेली होती.आणि गेल्या ५ दिवसापासून सेवा देत होते.
या पाच दिवसाच्या सेवेत साधारणतः २२,२०० ग्रंथांची सेवा झाल्याचे जिल्ह्यातील अनुयायांकडून सांगण्यात आले.








