नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथील एका गॅरेजमागे विना नंबरच्या अडीच लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील करणखेडा गावात एक ऑटो गॅरेज आहे. सदर गॅरेजच्या मागील बाजूस विना नंबरच्या आहेत.
अडीच लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाकी आढळून आल्या. याबाबत पोलिसांनी दीपक रविंद्र वसावे रा. करणखेडा ता. नंदुरबार व किशोर शिवा सोनवणे रा. माळीवाडा भिलाटी, नंदुरबार यांच्याकडे
दुचाकींच्या कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे दिले नाहीत. तसेच त्यांची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत पोशि. अभय शशिकांत राजपूत यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात भादंवि कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पानाजी वसावे करीत आहेत.








