Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 27 बेपत्ता लोकांना लागला शोध

team by team
May 29, 2022
in क्राईम
0
जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 27 बेपत्ता लोकांना लागला शोध

नंदुरबार । प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 10 बेपत्ता पुरुष व 17 महिला अशा 27 बेपत्ता लोकांना शोधण्यात यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, यांनी दि.22 मे 2022 रोजी झालेल्या मासिक गुन्हे बैठकीत हरविलेले पुरुष व महिला यांचा आढावा घेतला. त्यावेळेस सन 2014 पासून आजपावेतो 234 व्यक्ती अद्याप मिसिंग असल्याचे दिसून आले.

यासाठी त्यांनी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे एक विशेष पथक तयार करुन जास्तीत जास्त बेपत्ता महिला व पुरुष यांचा शोध घेण्याकरीता विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले.

सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये शहर पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे, अक्कलकुवा पोलीस ठाणे येथील प्रत्येकी 01 अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रत्येकी 01 अमंलदार यांचे पथक तयार करुन त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिसिंग डेस्कचे प्रमुख सहा.पोलीस उप-निरीक्षक भगवान धात्रक यांनी नियंत्रण ठेवले.

विशेष पथकांनी 6 दिवसातच हरविलेले/बेपत्ता 10 पुरुष व 17 महिला अशा एकुण 27 हरविलेल्या व्यक्तींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.

मोहिमे दरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडील 03 पुरुष व 03 महिला, नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे-01 महिला, तालुका पोलीस ठाणे-01 महिला, नवापूर पोलीस ठाणे-01 पुरुष व 02 महिला, शहादा पोलीस ठाणे-02 पुरुष व 05 महिला, सारंगखेडा पोलीस ठाणे-01 पुरुष, म्हसावद पोलीस ठाणे-01 पुरुष, धडगांव पोलीस ठाणे-01 पुरुष व 01 महिला,

अक्कलकुवा पोलीस ठाणे-01 पुरुष व 02 महिला, तळोदा पोलीस ठाणे-02 महिला असे एकुण 27 हरविलेल्या व्यक्तींना 06 दिवसातच शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.

पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडील आदेशान्वये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष येथील देखील मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आलेला आहे.

मिसिंग डेस्कच्या मार्फतीने पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस ठाणे स्तरावर दाखल बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व बेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करुन बेपत्ता इसमाबाबत माहिती घेवुन ते मिळुन येण्याकरीता प्रयत्न केले जातात.

गुन्हे तपासाबरोबरच बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचा शोध घेण्याकरीता कसोशीने प्रयत्न करण्याबाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत करुन ही मोहिम भविष्यात जास्त प्रभावीपणे राबविण्यात येईल असे निर्देश दिले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २९ मे

Next Post

आ. राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून जाम येथे शेत शिवार रस्ता तयार

Next Post
आ. राजेश पाडवी यांच्या स्थानिक  विकास निधीतून जाम येथे शेत शिवार रस्ता तयार

आ. राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून जाम येथे शेत शिवार रस्ता तयार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add