नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना ३ लाख रुपयापर्यंत कर्जावर व्याज माफी व ज्या शेतकऱ्यांनी कर्ज परत फेड वेळेवर केली त्या शेतकऱ्यांना व्याजाचे ५० हजार रुपये माफ करावेत असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला
असून त्या निर्णयाची अंमलबजावणी आतापर्यंत नंदुरबार सारख्या जिल्ह्यात झालेला दिसून येत नाही याबाबत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णदास पाटील यांनी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना निवेदन दिले आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की ,महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी तिन लाख रुपये शेतीसाठी कर्ज घेतले आहे.त्या शेतकऱ्यांना त्या कर्जावरील व्याज माफ करणे व ज्या शेतकऱ्यांनी शेती कर्जाची वेळेवर व्याजासह फरतफेड केली.
त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये माफ करावेत असा निर्णय बैठकीत झाला असून त्या निर्णयाचे अंमलबजावणी आजपर्यंत नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात झालेला दिसून येत नाही व याबाबत नंदुरबार जिह्यातील प्रत्येक बँक अनभिज्ञ असून याबाबत कोणालाही काहीही माहिती नाही.
यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यात टीम पाठवून शासनाचे काम व्यवस्थित चालू आहे का नाही याची पडताडणी सुरु केली आहे.
या शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळण्यासाठी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँकेचे शाखा अधिकारी व जिह्यातील सर्व बँकेचे शाखाधिकारी व शिवसेनेचेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात यावी.
झालेल्या शासन निर्णय बाबत सर्व बँकांना आदेशाचे पालन करण्यात यावे व शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यात यावा. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देतांना शिवसेनेचे नंदुरबार तालुका उपप्रमुख कृष्णदास पाटील व जीवन पाटील उपस्थित होते.