Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी सात भरारी पथक गठित

team by team
May 25, 2022
in कृषी
0
बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी सात भरारी पथक गठित

नंदुरबार l प्रतिनिधी
खरीप हंगाम 2022-2023 साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले असून
बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे,

रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक तसेच तालुकास्तरावर सहा असे सात भरारी पथक गठित करण्यात आली आहेत.अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली आहे.

जिल्हास्तरावर एक पथक स्थापन केले असून कृषि विकास अधिकारी, जि.प. हे भरारी पथकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पथकात मोहिम अधिकारी,जि.प. हे सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुणवत्ता अधिकारी नियंत्रण निरीक्षक व जिल्हास्तरीय निरीक्षक वजनेमापे हे सदस्य आहेत.

तालुकास्तरावर सहा पथक स्थापन केले असून तालुका कृषि अधिकारी याच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके कार्यरत करण्यात आली असून कृषि अधिकारी, पंचायत समिती, तालुकास्तरीय निरीक्षक वजनेमापे, तसेच संबंधित कार्यक्षेत्राचे मंडळ कृषि अधिकारी हे सदस्य असतील. तर कृषि अधिकारी, पंचायतसमिती, हे सदस्य सचिव असतील.

तालुकास्तरावरील भरारी पथक प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. नंदुरबार एस.ए.शेळके (9404110878), नवापूर बी.जे.गावीत (7588303692), अक्कलकुवा एन.ए.गढरी (9421512272), शहादा के.ई.हडपे (8055824864) तळोदा एन.आर.महाले (9420060528) तर अक्राणीसाठी आर.एस.महाले (9404970335/ 8329536159 ) असे आहेत.

या पथकामार्फत कृषि सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनाधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे,

शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये, कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करु नये.

जादा दराने कृषि निविष्ठाची विक्री करत असल्यास त्याबाबत तक्रार जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय पथकाकडे करावी. तसेच कृषि निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी व मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा,असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन

Next Post

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Next Post
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add