नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्याच्या लढ्या मधील महत्त्वाच्या ठिकाणी आणि स्मारकांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन संपूर्ण महाराष्ट्रभर केलेले आहे . त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात दि. 8 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी हुतात्मा शिरीष कुमार स्मारकावर वीरचक्र अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच ठिकाणी स्वातंत्र सैनिक किंवा त्यांच्या वारसांना सन्मानपत्र देण्याचा आणि त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ,तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री ॲड. के.सी. पाडवी आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ.कुणाल पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे,विनायक देशमुख,अभय छाजेड, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नंदुरबार, जिल्ह्याचे प्रभारी श्रीपानगव्हाणे,नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक भा. ई. नगराळे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड
सीमाताई वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्यातील नगरपालिका मध्ये असलेले काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि पंचायत समिती सभापती तसेच पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक व सुभाष पाटील हे करीत आहेत .सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याबद्दल आवाहन करण्यात आलेले आहे. covid-19 च्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करीत या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहायचे आहेत अशी विनंती नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.