Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास दरमहा होणारा विलंब टाळण्यासाठी सीएमपी प्रणाली लागू करावी: प्रहार शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदन

team by team
May 14, 2022
in शैक्षणिक
0
प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास दरमहा होणारा विलंब टाळण्यासाठी  सीएमपी प्रणाली लागू करावी:  प्रहार शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदन

म्हसावद l प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांंच्या वेतनास दरमहा होणारा विलंब टळावा यासाठी वेतन प्रक्रियेतील टप्पे कमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीएमपी प्रणालीद्वारे वेतन करावेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.रा. गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना प्राथमिक शिक्षक वेतनासाठी सीएमपी प्रणाली सुरु करणेबाबत ई-मेल द्वारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनाही निवेदन महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना नंदुरबार शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील यांंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास दरमहा होणारा विलंब टाळण्यासाठी सीएमपी वेतन प्रणाली लागु करावी. कारण जिल्हा परिषद आस्थापने अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन एका क्लिकवर अदा होते. मात्र जिल्ह्यातील मोठी आस्थापना असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाची तरतुद अर्थ विभागातुन गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. स्थानिक पंचायत समिती स्तरावरील अनेकविध अडचणींमुळे जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या वेतनास नेहमीच विलंब होतो . वेतन विलंबामुळे प्राथमिक शिक्षकांना बँकेचे, पतसंंस्थेेचे तसेच इतर कर्जाचे हप्ते वेळेवर भरता न आल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत आम्ही प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेले असून याबाबत प्रशासन अनुकुल असून देखील याबाबत ठोस अंमलबजावणीस विलंब होत आहे. तरी या पार्श्वभूमीवर जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात यावा.

बातमी शेअर करा
Previous Post

बामखेड्यात भिम आर्मीचा बैठकीत फलक अनावरणाचे नियोजन

Next Post

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ

Next Post
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add